कांद्याचा 'भाव' कमी झाला? आता कांद्याचा दर प्रति किलो….म. टा. प्रतिनिधी, पुणे: कांद्याची निर्यातबंदी, सर्वदूर थांबलेला पाऊस तसेच कांदा साठवणुकीवर आलेल्या मर्यादेबरोबर केंद्र सरकारने कांदा आयातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे अखेर सुरुच राहिली आहे. ८५ वरून ६० रुपयांपर्यंत कांद्याचे दर खाली घसरल्याने अवघ्या काही दिवसांत २० ते २२ रुपयांनी दर उतरले आहेत. कांदा आयातीमुळे दर आणखी घसरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

‘मार्केटयार्डात मंगळवारी ३५ ते ४० ट्रक जुन्या तसेच नवीन कांद्याची आवक झाली. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. जुन्या कांद्याचे गेल्या आठवड्यात एका किलोसाठी ८५ रुपये दर होते. आता ते दर ६५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या काही दिवसांत कांद्याची सुरु असलेल्या घसरणीमुळे २० ते २२ रुपयांपर्यंत दर उतरले आहेत. नवीन कांद्याची मंगळवारी ५ ट्रक आवक झाली असून त्यांना ३०० ते ३५० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. इराणचा कांदा आयात करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याने वाढलेले दर घसरण्यास सुरुवात झाली आहे,’ अशी माहिती कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.Source link

Comments are closed.