Marathi News

'तुमचा मुलगा आजही आम्हाला संपवायला निघालाय, पण…'मुंबई: हिंदुहृदय सम्राट यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. शिवसैनिक व महाराष्ट्रातील नेते शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. तर, काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनीही बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, त्याचबरोबर राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे हे सातत्याने व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतरही राणे कुटुंबीयांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दसरा मेळाव्यात राणेंच्या आरोपांचा समाचार घेत त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता. त्यामुळं राणे कुटुंब आणि ठाकरे यांच्यातील हे शाब्दिक युद्ध बराचकाळ टिकलं होतं. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी भाष्य केलं आहे.

‘बाळासाहेब आज तुम्ही नाहीत पण आजही राणे कुटुंब तुम्हाला विसरले नाही. तुमचा मुलगा आम्हाला संपवायला निघाला आहे. पण जे तुम्हाला शक्य झालं नाही ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही. स्वर्गीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आवाहन,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: