accident in ahmednagar: फूटपाथवर झोपलेल्या तिघांना टेम्पोने चिरडले; एक ठार – one killed, four injured in tempo accident in ahmednagar


अहमदनगर: नगर शहरातील नगर-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या चांदणी चौकात फूटपाथवर झोपलेल्या तीन बूट विक्रेत्यांना आयशर टेम्पोने चिरडले. रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये मेहताब शेख (वय २०, रा.मुजफ्फरनगर, उत्तरप्ररदेश) हा ठार झाला आहे.

अपघातामध्ये फूटपाथवर झोपलेले मुसाईद शेख (वय १८) व जावेद इरफान शेख (वय २२ दोघे रा.मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश) हे दोघे बूट विक्रेते गंभीर जखमी झाले आहेत. तर, टेम्पोमधील सुनील धोडींराम पाटील (वय २७) आणि भरत अरविंद पाटील (वय ४६, दोघे रा. पंढरपूर, जि.सोलापूर) हे दोन जण जखमी झाले असून या सर्व जखमींवर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाचा: ‘तुमचे कर्मच तुम्हाला तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते’

सोलापूरहून नगरच्या दिशेने येत असलेला एका मालवाहू आयशर टेम्पोच्या चालकाचे नियंत्रण चांदणी चौकातील आरटीओ ऑफिसजवळ सुटले. त्यामुळे हा टेम्पो थेट फूटपाथवर गेला, त्या ठिकाणी झोपलेल्या परप्रांतीय बूट विक्रेत्यांना त्याने चिरडले. रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात फूटपाथवर झोपलेला एक जण ठार झाला व फूटपाथवर झोपलेले इतर दोन जण व टेम्पोमधील दोन असे चार जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी चांदणी चौकात धाव घेतली. त्यानंतर अपघातात जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

वाचा: ‘लागिरं झालं जी’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचं निधनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *