Marathi News

Ahmednagar Crime News: पुणे: वाइन शॉप फोडले; पावणेदोन लाखांची चोरी – Wine Shop Burglary And Theft Of Rs 2 Lakh On Pune Ahmednagar Road Yerwada


येरवडा : पुणे-नगर महामार्गावर रामवाडीजवळ एका वाइन शॉपचे दुकान फोडून एक लाख ८० हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश पुरुषोत्तमदास मोजवाणी (वय ४८, रा. साधू वासवानी चौक) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे-नगर महामार्गावर रामवाडीनजीक फिर्यादी यांचे एन. एम. वाइन्स नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून फिर्यादी घरी निघून गेले. सोमवारी पहाटे चार वाजण्याचा सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दुकानाचे शटर उचकटून आतील लोखंडी जाळीचे दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर एक लाख ८० हजार रुपये ठेवलेले दुकानातील लोखंडी तिजोरी घेऊन पळ काढला. सोमवारी सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची घटना कैद झाली असून, त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?

पुणे: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड

नागपूरमध्ये मोठी कारवाई; लाखोंचे एमडी जप्त

धक्कादायक! १० वर्षांच्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कारSource link

You may also like

%d bloggers like this: