amruta fadnavis news song: 'कौतुक आणि टीका दोघांचेही स्वागत, लवकरच नवीन गाणं घेऊन येणार' - thank you so much for appreciating the womens’ song- tila jagu dya; says amruta fadnavis

amruta fadnavis news song: ‘कौतुक आणि टीका दोघांचेही स्वागत, लवकरच नवीन गाणं घेऊन येणार’ – thank you so much for appreciating the womens’ song- tila jagu dya; says amruta fadnavis


मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नुकतच एक गाणं प्रदर्शित झालं आहे. अमृता यांच्या या गाण्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी आणखी एक ट्विट केलं आहे.

अमृता यांनी भाऊबीजेच्या निमित्तानं एक गाणं गायलं आहे. प्रत्येक भगिनीला हे गीत समर्पित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तिला शकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या, असं म्हणत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर अमृता यांनी आणखी एक ट्वीट केलं असून या व्हिडिओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांत या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईन,’ असं अमृता यांनी म्हटलं आहे.

महेश टिळेकरांची टीका

प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनीही एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या गाण्यावर टीका केली आहे. ‘चांगला आवाज असूनही केवळ नाव नाही हाती भरपूर पैसा नाही म्हणून नवीन गायकांना कुणी मदतीचा हात देऊन संधी देणारा पाठीशी उभा राहत नाही. सुमधुर आवाज असलेल्या महाराष्ट्रातील अनेक नवीन गायकांना साधी कुठं संधी मिळत नाही पण जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या ह्रदयात धडकी भरते आणि गाणं हे दुसऱ्याला आनंद देण्याऐवजी दुःख देण्यासाठीच गायले जाते असा समजच होण्याची शक्यता निर्माण होते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे? असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.

वाचाः अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं आलं; मराठी दिग्दर्शकानं दिली ‘अशी’ प्रतिक्रियाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: