Marathi News

anil deshmukh: रामदास आठवलेंना करोनाची लागण; गृहमंत्र्यांनी दिल्या खास कवितेतून सदिच्छा – anil deshmukh wishesh rpi ramdas athavle speedy recovery


मुंबईः रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आठवले यांनी लवकर करोनावर मात करावी यासाठी अनेकांनी त्यांना सदिच्छा दिल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील खास आठवलेंच्याच स्टाइलमधून त्यांना बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना

देशभरात करोनाची साथ सुरू झाल्यानंतर रामदास आठवले यांनी गो करोना गो असा नारा दिला होता. त्यानंतर आठवले चांगलेच चर्चेत आले होते. हाच धागा पकडत अनिल देशमुख यांनीही खास कवितेतून आठवलेंना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या आहेत. करोना- गोचा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, करोना नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.

मराठीचा अपमान; कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर

दरम्यान, रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोषला रिपाइं पक्षात प्रवेश दिला होता. त्यावेळी रामदास आठवले तिथं उपस्थित होते. तसंच, पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होती. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाकडून आठवलेंच्या संपर्कात असलेले व लक्षण जाणवत असणाऱ्यांना करोनाची चाचणी करून घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

पुस्तकात मुख्यमंत्र्यांना दिलेला सल्ला कुठे? पवारांचे राज्यपालांना पत्रSource link

You may also like

%d bloggers like this: