Marathi News

ashish shelar: भाजप नेते आशिष शेलार यांना केंद्राकडून नवी जबाबदारी – ashish shelar elected as election co-incharges for the upcoming greater hyderabad municipal corporation (ghmc) election.


मुंबईः भाजप नेते आशिष शेलार यांना पक्षाकडून नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशिष शेलार यांची हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच भाजपनं राज्य प्रभारींची नव्या टीमची यादी जाहीर केलीय. या टीममध्ये अनेक नावं जुने आहेत परंतु, काही नवीन नावं अनेकांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करत आहेत. त्यानंतर आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी राष्ट्रीय यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर, कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

करोनाग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा; ‘हे’ आकडे शुभसंकेत देणारे

प्रेयसीवर अॅसिड हल्ला करुन पेटवले; आरोपीला २४ तासात अटक

दरम्यान, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना भाजपनं राष्ट्रीय स्तरावर संधी दिली आहे. या दोघांचीही भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातून विजया रहाटकर व सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: