Marathi News

Avinash Rajure: प्रेयसीवर अॅसिड हल्ला करुन पेटवले; आरोपीला २४ तासात अटक – beed: woman set ablaze by partner; accused arrested by nanded police


बीडः नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील तरुणीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला त्यानंतर राज्यातून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत होती. यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र वेगानं फिरवत आरोपी अविनाश राजूरे याला अटक केली आहे. सदर घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्यात नेऊन तिच्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. आरोपी नांदेड पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

वाचाः प्रेयसीवर अॅसिड टाकले, मग पेट्रोल टाकून पेटवले; बीडमध्ये खळबळ

काय आहे प्रकरण?

नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील अविनाश राजूरे याचे गावातील एका २२ वर्षीय तरुणी सोबत प्रेमसंबंध जुळले होते. ते दोघेही पुण्यात एकत्र राहत होते. दिवाळी निमित्त शनिवारी हे दोघेही दुचाकीने पुण्याहून गावाकडे निघाले होते. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास बीड जिल्ह्यातील येलंबघाट जवळ अविनाशनं दुचारी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर प्रेयसीला रस्त्यापासून दूर एका खड्यात नेऊन तिच्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला पेटवून देऊन तो तिथून पसार झाला.

वाचाः करोनाग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा; ‘हे’ आकडे शुभसंकेत देणारे

तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, पहाटेची वेळ असल्यानं कुणीही मदतीला येऊ शकले नाही. मोठ्या प्रमाणावर भाजलेली ही तरुणी तब्बल १२ तास रस्त्यालगत पडून होती. दुपारी तीनच्या सुमारास एका वाहनधारकाला तिचा आवाज ऐकू आला. त्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जखमी तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: