Marathi News

Bala Nandgaonkar: मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे भाजपची साथ देणार? बाळा नांदगावकर यांनी दिलं ‘हे’ उत्तर – bala nandgaonkar reaction over bjp- mns alliance


मुंबई: मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा ठाम निर्धार भाजपनं केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेला हा निर्धार म्हणजे शिवसेनेला दिलेले आव्हान आहे, असं बोललं जातंय. त्याचबरोबर, शिवसेनेसोबत लढण्यासाठी भाजप मनसेची साथ घेणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही एका पत्रकार परिषदेत भाजप – मनसेसोबत युतीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनीही, निवडणुकींच्या वेळी याबाबत निर्णय घेऊ, आजतरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, असं ते म्हणाले आहेत. तसंच भविष्यात मनसेसोबत जाण्यास भाजप सकारात्मक असल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. शिवाय, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही मनसे- भाजप युतीबाबत भाष्य केलं आहे.

BMC: मनसेसोबत युती करणार? भाजप नेत्यानं दिले ‘हे’ संकेत

प्रवीण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर बाळा नांदगावकर यांनी युतीबाबत प्रश्न विचारल्यानंतर, त्यावर ‘मनसे प्रमुख राज ठाकरे याबद्दल निर्णय घेतील. राज साहेबांना विचार करायला प्रवीण दरेकर आता खूप मोठे झालेत, असं मला वाटतं, असा मिश्किल टोला यावेळी त्यांनी लगावला आहे. तसंच, तो विषय माझा नाही. हा विषय पक्षप्रमुखांचा आहे. आत्तापर्यंत आमची भूमिका एकला चलोरे राहिली आहे आणि पुढे ही आमची तीच भूमिका राहणार आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सोमवारपर्यंत वीज बिलं माफ न झाल्यास आंदोलन; मनसेचा सरकारला इशारा

दरम्यान, सर्वसामान्यांना आलेल्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न राज्यात सध्या चांगलाच पेटला आहे. सोमवारपर्यंत वीज बिल माफ केले नाही तर राज्यात जनआंदोलन करु, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. वाढीव वीजबिलात माफ करण्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे. त्यामुळं जनतेमध्ये संतापाची भावना आहे. सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

… मग पेंग्विन गँगची पार्टी सुरु; नितेश राणेंचा महाविकास आघाडीला टोलाSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: