ठाणे: मकर संक्रात म्हटलं की आकाशात पंतग उडवणं आलंच. दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पंतग उडवल्या जातात आणि त्याचा आनंद काही औरच असतो. मात्र, पतंग उडवण्यासाठी नायलॉनचा मांजा वापरण्यात येत असल्यामुळे पशुपक्षी जखमी होण्याबरोबर त्यांचे प्राण जाण्याचाही मोठा धोका असतो. या शिवाय इतरही अनेक समस्या निर्माण होतात. हे लक्षात घेत ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नायलॉनचा मांजा आणि काचेची कोटींग असलेल्या मांजाची विक्री, साठा आणि वापर यावर बंदी घालण्यात आली आहे.
या मांजामुळे अपघात होऊन दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता असते. तसेच शाळकरी मुले देहभान विसरून पंतगाच्या मागे पळताना देखील अपघातग्रस्त होतात. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. नायलॉनचा मांजा हा पर्यावरणासाठी हानिकारक असतो. नायलॉन मांजा लवकर तुटत नाही. तसेच त्याचा नाशही होत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नायलॉनचा मांजा तसेच काचेची कोटिंग असलेल्या मांजाची विक्री, साठा आणि वापर यावर बंदी घातली आहे.
क्लिक करा आणि वाचा- मुंडेंनी दोन दिवसांत राजीनामा न दिल्यास भाजप उचलणार ‘हे’ पाऊल
याबाबतचे आदेश आयुक्तांनी बुधवारी मनाई आदेश जारी केले असून हा आदेश १४ जानेवारी ते ३१ जानेवारी रात्री १२ वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
क्लिक करा आणि वाचा- ‘प्यार किया तो डरना क्या?’; शिवसेना नेत्याकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
Source link
Like this:
Like Loading...
Related