वळपाडा ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली. वळपाडा गावातील पारसनाथ कंपाऊंड, गाळा नंबर बी-५ येथे जे. ई. मॅकेनिकल कंपनी असून याच कंपनीत हा स्फोट झाला. कंपनीत लोखंड कटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. या दुर्घटनेत सहा कामगार गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयांत हलवण्यात आले मात्र, त्यातील दोन कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर अन्य चार कामगारांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. याप्रकरणी नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कंपनी सील करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
वाचा: सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आईची फसवणूक; अडीच कोटी रुपयांना गंडा
मृत व जखमी कामगारांची नावे पुढील प्रमाणे…
मृत कामगार:
१) प्रेम अनंता भोईर (वय २४ वर्ष ),
२) अक्षय अशोक गौतम (वय २१ वर्ष)
जखमी कामगार:
१) मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन,
२) बजरंग शुक्ला
३) अल्पेश भोईर
४) अज्ञात
मुनीर व बजरंग या दोघांना मानकोली नाका येथील लोटस रुग्णालयात तर अल्पेश आणि अन्य एका जखमीला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाचा: आदिवासींचा आधारवड हरपला; माजी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन