महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्वीट करत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी प्रेमाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘बंदला पाठींबा देणारे सत्ताधारी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचं शेतकरी प्रेमच मुळात नकली आहे,’ असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ‘मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी बांधावर जाऊन आश्वासन देणारे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तरी अद्याप महाराष्ट्रातील शेतकऱ्याला पुरेशी मदत मिळालेली नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही. इतकेच नव्हे, करोना काळात शेतकऱ्यांना कोणतीही मदत राज्य सरकारनं केलेली नाही,’ असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याच आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यालाही भाजपनं उत्तर दिलं आहे. ‘काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळात खासगीकरण सुरू झालं. शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांनी पाठवलेलं एक पत्र आज समोर आलं आहे, ज्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी खासगीकरणाला चालना देण्याबाबत लिहिलं आहे,’ याकडंही उपाध्ये यांनी लक्ष वेधलं आहे.
वाचा: रक्तदान करा, १ किलो पनीर, चिकन मिळवा! मुंबईत अनोखा उपक्रम
वाचा: आरएसएस नावाचाच आग्रह का?; कोर्टाने फेटाळली ‘ती’ याचिका