Marathi News

car catches fire in satara: Car Catches Fire: मुंबईहून वाईला चालले होते; खंबाटकी घाट उतरताच कारने घेतला पेट – satara car catches fire in khambatki ghat


सातारा: मुंबईहून वाईला जाणाऱ्या कारने खंबाटकी घाट उतरत असतानाच अचानक पेट घेतला आणि आगीचा भडका उडून काही क्षणांत कार जळून खाक झाली. ही दुर्घटना मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधील दोघेजण वेळीच कारमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. ( Car Catches Fire In Satara Latest News Updates )

वाचा: मिनीबस पुलावरून कोसळून ५ ठार; गोवा पिकनिकआधीच काळाने गाठले

खंबाटकी घाट उतरत असताना भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेळे गावानजीक पहिल्याच वळणावर ही दुर्घटना घडली. कारने ( क्र. एमएच ०६- एडब्ल्यू ६७५५ ) अचानक पेट घेतला आणि त्या आगीत पूर्ण कारच जळून खाक झाली. मुंबईहून वाईला ही कार चालली होती. घाटरस्त्यात उतारावरील वळणावर कार आली तेव्हाच कारने पेट घेतला. इंजिन जास्त गरम झाल्याने शॉर्ट सर्किट होवून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार पेटल्याचे लक्षात आल्यावर चालकाने कार रस्त्याच्या एका बाजूस उभी केली व कारमधील दोन्ही व्यक्ती तत्काळ बाहेर पडल्या. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. हे दोघेजण मुंबईहून वाईला चालले होते.

वाचा: लाल झेंडे फडकावत शेतकरी ट्रॅकवरून धावले; शेकडो प्राण वाचले!

कारची आग भडकल्यानंतर लगतच असलेल्या झाडालाही आग लागली व जवळच्या परिसरात आग पसरली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काहीवेळ दहशत पसरली होती. वेळे गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनाही पाचारण केले. तोपर्यंत घाटातील संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली होती. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली. वाई नगरपालिकेचा अग्निशामक बंबदेखील घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेचा अधिक तपास भुईंज पोलीस करीत आहेत.

वाचा: ठाकरे सरकारचा वीज बिल घोटाळा?; भाजपने केला ‘हा’ गंभीर आरोपSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: