Marathi News

chadrakant patil: सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा?; चंद्रकांत पाटील म्हणतात… – chadrakant patil reaction on supriya sule chief minister of maharashtra sharad pawar ashish shelar comment


मुंबईः महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कतृत्वान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं आशिष शेलारांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे होता, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यासर्व प्रकरणावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे. तसं झालं तर माझ्यासारख्या माणसाचंही त्याला समर्थन असू शकतं, अशी अपेक्षा आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. यावर चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट करत सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं की नाही हे त्यांनीच ठरवायचं यात आमची काहीच भूमिका नाही, असं मत मांडलं आहे.

‘इतिहासात अनेक कतृत्ववान महिला होऊन गेल्या आहेत. सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. एका पुस्तकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यातला दाखला देत शेलार यांनी मराठा महिलेला मुख्यमंत्री करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला, भाजपच्या मराठा महिला किंवा आणखी कोणाबाबत ते वक्तव्य नव्हतं,’ अशी ठोस भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: