Marathi News

chandrakant patil: Chandrakant Patil: ठाकरे सरकारला बसणार वीजबिलाचा झटका; भाजपने दिली ‘ही’ हाक – bjp will protests against inflated power bills


मुंबई: राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले. ( BJP will protests against Inflated Power Bills )

वाचा: मुंबईतही भाजपला बसणार झटका!; शिवसेनेसाठी काँग्रेस खेळणार ‘ही’ चाल

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लॉकडाऊन काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच स्वतः वीजबिलांबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजप वीजबिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.

वाचा: राज्यातील गावांत निवडणुकीचे वारे; भाजपपुढे असेल ‘हे’ मोठे आव्हान

लॉकडाऊन काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले आली. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधतील. जनतेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

वाचा: टोलमध्ये महत्त्वाचा बदल; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णय

दरम्यान, मनसेनेही करोना काळातील वाढीव वीजबिलांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत याबाबत एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. सोमवारपर्यंत वाढीव वीजबिले माफ केली नाही तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराच मनसेने या बैठकीनंतर दिला आहे. त्यामुळे येणारा आठवडा महाविकास आघाडी सरकारला आंदोलनांचे झटके देणारा ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.

वाचा: मनसे नेमकं काय करणार?; ‘या’ ट्वीटमुळं चर्चेला उधाण



Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: