Marathi News

Chhath Puja Guidelines: Chhath Puja Guidelines: मुंबईत छठपूजा यंदा कुठे होणार?; महापालिकेने घेतला हा खूप मोठा निर्णय – bmc issues guidelines for chhath puja


मुंबई: मुंबईत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही छठपूजा पर्व साजरे केले जाणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या चौकटीत राहून हा उत्सव साजरा करावा लागणार आहे. छठपूजेसाठी मुंबई महापालिकेने आज गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यात गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Mumbai Chhath Puja Guidelines Latest News Updates )

वाचा: ऐन सणासुदीत राज्यातील करोनाचे ‘हे’ आकडे लढ्याला बळ देणारे!

छठपूजेचा उत्सव यंदा २० आणि २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जुहू किनारी दरवर्षी छठपूजेसाठी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. यंदा मात्र करोनामुळे मुंबई पालिकेने काही अटी घातल्या असून त्यात मुख्य अट म्हणजे समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाचा: मॉडर्ना, फायजर, की स्पुटनिक? जाणून घ्या भारतासाठी कोणती लस फायदेशीर!

चौपाटी, नदीकाठ वा तलावांवर छठपूजेचे आयोजन केल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होईल व सोशल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होणार नाही. त्यामुळेच अशा ठिकाणी छठपूजेचे आयोजन करण्यास यंदा प्रतिबंध करण्यात येत आहे, असे पालिकेने नमूद केले आहे. गर्दी टाळून हे पर्व साजरे व्हावे म्हणून पालिका संबंधित संस्थांना परवानगी देईल. ही परवानगी विभागवार देण्यात येईल. परवानगी देताना जे नियम व अटी घालण्यात येतील त्यांचे पालन संबंधित संस्थांनी करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संकटामुळे यंदा सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव आणि दिवाळी हे प्रमुख सण व उत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरे करण्यात आले. ही बाब लक्षात घेता छठपूजेचा उत्सवही साधेपणाने साजरा व्हावा, या उत्सवात सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम काटेकोरपणे पाळले जावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने आपल्या नियमावलीतून केले आहे.

वाचा: वीजबिलावर शब्द फिरवला; माजी मंत्र्याने ठाकरे सरकारला दिली ‘ही’ उपमा

दरम्यान, महाराष्ट्रात राजधानी मुंबईला करोनाची सर्वाधिक झळ बसलेली आहे. देशातील करोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट अशी मुंबईची ओळख झाली होती. या संकटाशी नेटाने मुकाबला करत मुंबई आज सावरताना दिसत आहे. पालिकेच्या अथक प्रयत्नांमुळे करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसत आहे. त्यामुळेच सण आणि उत्सवांच्या धामधूमीत पुन्हा मुंबईचे आरोग्य ढासळू नये म्हणून आवश्यकती सर्व खबरदारी पालिका घेत आहे.

वाचा: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पंकजा नतमस्तक; शिवसेना-भाजप युतीबाबत केले मोठेSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: