Marathi News

cm uddhav thackeray: मुख्यमंत्र्यांचा आज जनतेसोबत संवाद; ‘या’ मुद्द्यांवर बोलणार? – cm uddhav thackeray to address the state at 8 pm today


मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. करोनाच्या साथीबरोबरच राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरही मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे.

करोना संसर्गाच्या काळात जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलांचा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. विरोधकांनीही राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तर, मनसेनंही सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम देत वीज बिलाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन करु, अशा इशारा दिला होता. त्यामुळं वाढीव वीज बिलांचं काय होणार, यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. त्यामुळं आजचा मुख्यंमत्र्यांचा संवाद अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

वाचा: सर्वसामान्यांचा लोकल प्रवास लांबणीवर?; महापालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

गेल्या काही दिवसांत दिल्लीत करोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. तर, राज्यासह मुंबईतही करोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसंच, सोमवारपासून राज्यातील काही भागांतील शाळा सुरु होत आहेत. त्यामुळं या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काही निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाचा:पुन्हा सज्जता! मुंबईबाहेरुन येणाऱ्यांच्या चाचण्या, करोना केंद्रे सतर्क

दिवाळीनंतर राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला होता. दिल्लीतही करोनाची दुसरी लाट आली असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यानं खबदरीचा उपाय म्हणून दिल्ली – मुंबई विमान सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाचा:नियोजन न करता शिर्डीत येऊ नका, ‘हे’ आहे कारण



Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: