Marathi News

comedian Bharti Singh: भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाला अटक; तब्बल १७ तासांच्या चौकशीनंतर कारवाई – haarsh limbachiyaa, husband of comedian bharti singh, arrested by narcotics control bureau (ncb)


मुंबई: विनोदी अभिनेत्री भारती सिंह हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केल्यानंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचिया यालासुद्धा अटक करण्यात आली आहे. तब्बल १७ तासांच्या चौकशीनंतर हर्ष याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

अटकेनंतर आज भारती आणि हर्ष यांना वैद्यकिय चाचण्यांसाठी रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तसंच, आज त्यांना हॉलिडे कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

एनसीबीकडून मुंबईत अमली पदार्थ दलाल तसेच त्याचे सेवन करण्यांविरुद्ध जोमाने कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत बॉलिवूडशी निगडित अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. अलिकडेच अभिनेता अर्जुन रामपाल याचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी भारती सिंह हिच्या अंधेरी पश्चिमेस लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातील घरातही एनसीबीने छापा टाकला.

‘ पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील स्वपक्षीयांना एवढं सांगितलं तरी…’

या मोहिमेचे प्रमुख असलेले एनसीबी मुंबईचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले की, ‘मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. छाप्यात ८६.५० ग्रॅम गांजा सापडला आहे. भारतीसह तिचा पती हर्ष या दोघांनीही गांजाचे सेवन करीत असल्याचे मान्य केले आहे. त्यानुसार भारतीला अटक करण्यात आली आहे.

‘महापुजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे’

खारदांडा येथेही छापा

याखेरीज एनसीबीने खारदांडा परिसरातही शनिवारी छापा टाकला. त्यात एका २१ वर्षीय दलालाला पकडण्यात आले. त्याच्याकडे विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा साठा सापडला. त्यामध्ये एलसीडीच्या १५ डब्या, ४० ग्रॅम गांजा तसेच निट्राझेपाम या प्रतिबंधित अमली पदार्थांचा समावेश आहे. आणखी एका प्रकरणात काही दलाल फरार असून त्यांचा एनसीबीकडून कसून शोध सुरु आहे.

दोन वेळचं जेवणंही मिळत नव्हतं, आज कोट्यवधींची मालकीण आहे भारतीSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: