Marathi News

Congress Says It Will Have No Alliance With Shiv Sena For 2022 BMC Election – BMC Election 2022: मुंबईतही भाजपला बसणार झटका!; शिवसेनेसाठी काँग्रेस खेळणार ‘ही’ चाल


मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार असून मुंबईवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवल्यानंतर त्यावर महाविकास आघाडीतील पक्षांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेने भाजपच्या या निर्धाराची खिल्ली उडवली आहे तर काँग्रेसनेही या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ( Congress On BMC Election 2022 Latest News Updates )

वाचा: ‘तुमच्या १०० पिढ्या आल्या तरी मुंबईवरचा भगवा उतरणार नाही’

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिंकण्याचा संकल्प केला आहे. शिवसेनेवर सातत्याने हल्ले करणारे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर त्यासाठी मोठी जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेने वेळ न दवडता भाजपच्या निर्धाराची जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘भाजपला मुंबईतल्या आर्थिक उलाढालींमध्ये, येथल्या शेअर बाजारात, जमिनींत रस आहे. मुंबईला दिल्लीचं पायपुसणं बनवण्याचा त्यांचा इरादा आहे पण ते आम्ही होऊ देणार नाही’, असा जोरदार पलटवार करतानाच ‘तुमच्या १०० पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरून शिवरायांचा भगवा झेंडा कोणी खाली उतरवू शकत नाही’, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. या आव्हान-प्रतिआव्हानाच्या पार्श्वभूमीवर युती आघाडीच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत.

वाचा: काँग्रेसला उद्ध्वस्त करण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा डाव!; ‘या’ नेत्याचा दावा

एकीकडे भाजप राज ठाकरे यांच्या मनसेशी हात मिळवू शकते असे बोलले जात असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत असणार का, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यात काँग्रेसच्या पालिकेतील प्रमुख नेत्याने खूप मोठे विधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई पालिकेत सध्या काँग्रेस विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडेच आहे. त्यामुळेच निवडणुकीतही आम्ही विरोधातच लढणार असे पालिकेतील काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत उत्तर भारतीय मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. हे मतदान काँग्रेसला होते व त्यावर भाजपचा डोळा असल्याचे आम्हाला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे ही मते फोडण्याचा भाजपचा मनसुबा उधळण्यासाठी आम्हाला वेगळं लढावं लागेल, असे राजा म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेसचा मतदार वेगळा आहे. त्यामुळे आम्ही आघाडी करून निवडणूक लढणे अयोग्य ठरेल, असे सांगतानाच निवडणुकीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस आघाडी शक्य आहे, असेही रवी राजा यांनी स्पष्ट केले. राजा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मुंबई पालिका निवडणुकीत पक्षीय राजकारणाचे नवे रंग पाहायला मिळतील हे आताच स्पष्ट झाले आहे.

वाचा: मुंबई महापालिका निवडणूकीत मनसे भाजपची साथ देणार? बाळा नांदगावकर यांनी दिलं ‘हे’ उत्तरSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: