वाचाः मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचे पाणी बिल थकित? BMCनं दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
आज राज्यात ४ हजार ६१० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, २ हजार ९४९ नवे करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या आता १७ लाख ६१ हजार ६१५पर्यंत झाली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णवाढीचा टक्का काही प्रमाणात वाढत आहे. आजही राज्याचा रिकव्हरी रेट ९३. ५४ टक्के इतका झाला आहे.
वाचाः ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे सज्ज; राज ठाकरेंनी दिले ‘हे’ आदेश
राज्यात आज ६० करोना बाधित रुग्ण दगावले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा ४८ हजार २६९ इतका झाला आहे. राज्यात करोना मृतांचा आकडा नियंत्रणात येत असताना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे. सध्या राज्यात ७२ हजार ३८३ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
वाचाः ‘करोनानं तुम्हाला हे कानात येऊन सांगितलंय का?‘
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख ४८ हजार ३६२ चाचण्यांपैकी १८ लाख ८३ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ४०६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ४ हजार ३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.