Marathi News

coronavirus in maharashtra: करोना संसर्गाचा परिणाम किडनीवर होतोय? – patients with mild kidney problems now on permanent dialysis


मुंबईः करोना संसर्गाची दुसरी लाट भारतात येण्याची शक्यता असतानाच आणखी एक संकटाने नागरिकांची भीती वाढवली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याच्याशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याचं आधीच निदर्शनास आलं होतं. त्यानंतर आता करोना संसर्गाचा परिणाम किडनीवर सुद्धा होत असल्याचं समोर आलं आहे.

फफ्फुसांबरोबरच करोना विषाणू किडनीवर देखील परिणाम करत आहे. किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींना संसर्ग झाल्यामुळं किडनी कायमची निकामी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत आत्तापर्यंत ११६ अशा घटना घडल्या आहेत. किडनीचा सौम्य आजार असणाऱ्या व्यक्तींना करोना संसर्गाच्या आधी डायलिसिसची गरज भासली नव्हती मात्र, करोना संसर्गानंतर त्यांना डायलिसिसची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय.

मार्च ते ऑगस्टच्या काळात केईएम रुग्णालयात दाखल केलेल्या करोना रुग्णांपैकी ११६ रुग्णांच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला आहे. तर, त्यातील ४४ रुग्ण करोनामुक्त झाल्यानंतरही किडनीचा त्रास तसाच कायम राहिला आहे. या रुग्णांची किडनी कायमची निकामी झाली असून त्यांना डियलिसीस किंवा किडनी प्रत्यारोपणची आवश्यकता भासली आहे. अॅक्युट किडनी इंजुरीची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये करोनाचा मृत्यूदर अधिक असल्याचं निरीक्षण केइएमच्या डॉक्टरांनी नोंदवलं आहे. तसंच, किडनीची समस्या असलेल्या ११६ रुग्णांपैकी ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनासंसर्गाचा किडनीवर परिणाम

करोनाचा विषाणू किडनीवर थेट संसर्ग होतो त्यामुळं रक्त प्रवाहात गुठळ्या तयार होतात आणि या गुठळ्यांमुळं रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, व किडनीचे कार्य सुरळीत होत नाही. किडनीच्या सेलमध्ये करोनाचा प्रवेश झाल्यामुळं रोगप्रतिकार शक्ती कमी होते.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: