मुंबईः राज्यातील करोना संसर्गाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होत असून रिकव्हरी रेटही ९० टक्क्यांच्या जवळ पोहचला आहे. तर, करोनामृतांची संख्याही घटली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (
Coronavirus in maharashtra)
राज्यात गेल्या काहि महिन्यांपासून करोना संसर्गानं थैमान घातलं होतं. राज्यात करोनाची परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असातनाच ऑक्टोबर महिन्यात करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. हा राज्यासाठी मोठा दिलासा असल्याचं बोललं जात आहे. आजही तब्बल ७ हजार ८ ३६ रुग्ण बरी होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४ लाख ७८ हजार ४९६वर पोहोचली आहे. तर, राज्याचा रिकव्हरी रेट ८९. ३९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज ५ हजार ३६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या १ लाख ३१ हजार ५४४ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आज ११५ करोना बाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून सध्याचा मृत्यूदर २. ६३ टक्के इतका आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Source link
Like this:
Like Loading...
Related