Marathi News

coronavirus in maharashtra: राज्यात करोना रुग्णांची वाढ मंदावतेय; पण मृत्यूदरानं वाढवली चिंता – maharashtra reports 5,011 new #covid19 cases, 6,608 recoveries


मुंबई: राज्यात करोना रुग्णांची संख्या जरी अटोक्यात येत असली तरी करोना मृतांचा आकडा चिंतेत भर घालणारा आहे. आज राज्यात तब्बल १०० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ४६ हजार २०२ इतकी झाली आहे. (Coronavirus in maharashtra)

राज्यात ऑक्टोबरमध्ये करोनाचा संसर्ग उतरणीला आला आहे. राज्यातील नवीन करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी राज्यातील करोना मृतांची संख्या मात्र अद्याप कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील मृत्यूदरही २. ६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातील करोना मृतांचे प्रमाण अटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळत आहे.

‘भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटी’

आज राज्यात ६ हजार ६०८ रुग्णांनी करोनावर मात केली असून राज्यातील एकूण करोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ३० हजार १११ इतकी पोहोचली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेटही ९३ टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. आज शासनानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९२. ७५ टक्के इतका झाला आहे. तर, ९९ लाख ०० हजार ८७८ चाचण्यांपैकी १७ लाख ५७ हजार ५२० चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत.

‘वीज बिलात सूट द्या, अन्यथा तुमची सुट्टी करायला वेळ लागणार नाही’

आज राज्यात ५ हजार ०११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १७ लाख ५७ हजार ५२० इतकी झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. आज ८० हजार २२१ अॅक्टिव्ह रुग्ण राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: