Marathi News

coronavirus in maharashtra: Coronavirus In Maharashtra: ऐन सणासुदीत राज्यातील करोनाचे ‘हे’ आकडे लढ्याला बळ देणारे! – maharashtra reports 2840 new covid 19 cases 5123 recoveries and 68 deaths today


मुंबई: राज्यात आज ६८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २ हजार ८४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५ हजार १२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी होत असून आज हा आकडा ८१ हजारांच्या टप्प्यावर आला आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest News Updates )

वाचा: मॉडर्ना, फायजर, की स्पुटनिक? जाणून घ्या भारतासाठी कोणती लस फायदेशीर!

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनामृत्यूंचा आकडा कमी झाल्याचे दिसत आहे. सोमवारी राज्यात ६० करोना बाधितांचा मृत्यू झाला होता तर आज राज्यात ६८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यातील ५१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. आज नोंदवण्यात आलेल्या मृतांपैकी सर्वाधिक १४ मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झाले आहेत. करोनामुळे राज्यात आतापर्यंत ४६ हजार १०२ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.६३ टक्के एवढे आहे.

वाचा: खरंच की काय…काही सेकंदात माउथवॉश करणार करोनाचा खात्मा

आज दिवसभरात २ हजार ८४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर त्याचवेळी ५ हजार १२३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (Recovery Rate) ९२.६४ टक्के इतके झाले आहे. राज्यात आजवर करोनाच्या ९८ लाख ४७ हजार ४७८ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यातील १७ लाख ५२ हजार ५०९ चाचण्यांचे (१७.८ टक्के) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अॅक्टिव्ह म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा वेगाने खाली येत असून आजच्या नोंदीनुसार सध्या ८१ हजार ९२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सर्वाधिक १६ हजार ३८४ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर ठाणे जिल्ह्यात १३ हजार ४६६ आणि मुंबईत १२ हजार ३६५ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. राज्यात ७ लाख ९१ हजार १२० जणांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे तर ५ हजार ३६७ रुग्णांना संस्थात्मक क्वारंटाइमध्ये ठेवण्यात आले आहे.

वाचा: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पंकजा नतमस्तक; युतीबाबत केले मोठे विधानSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: