नागपूर: पत्नीच्या विरहात गुन्हेगाराने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. ही घटना निळकंठनगरमधील चिमूरकर ले-आऊट येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. प्रवीण लालसिंग चव्हाण,असे मृतकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण याच्याविरुद्ध, चोरी, हत्येचा प्रयत्न आदींसह २०पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पाच दिवासांपूर्वीच पोलिसांनी त्याला तलवारीसह अटक केली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रवीण याचा पत्नीसोबत वाद व्हायला लागला. त्याला दारुचे व्यसन जडल्याने वाद वाढले. त्याची पत्नी माहेरी गेली. तो नैराश्यात गेला. शनिवारी रात्री त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी प्रवीण याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘माझे आयुष्य बर्बाद झाले आहे. माझी पत्नीही मला सोडून गेली. मी आता जिवंत राहून काय करू’,असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. प्रवीण याच्या आत्महत्येप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.Source link