Eknath Khadse: एकनाथ खडसेंचे करोना चाचणीचे अहवाल आले! – eknath khadse tests negative for coronavirus


जळगाव: नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा छातीच्या सीटी स्कॅनचा करोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे हॉस्‍पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्या केलेल्या दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. (Eknath Khadse tests Negative for Covid 19)

वाचा: अजित पवारांनी सोडली आणखी एक महत्त्वाची समिती; कारण गुलदस्त्यात

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे व त्यांची नातवंडे गेल्या आठवड्यात कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यांच्यावर जळगावातील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात असलेले एकनाथ खडसे यांची देखील गेल्या आठवड्यात करोना चाचणी करण्यात आली होती. यात अहवाल निगेटिव्ह आला होता. तरी देखील खडसे निवासस्थानी विलगीकरणात होते. मात्र, तीन-चार दिवसांपासून खडसेंनाही ताप, सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने गुरुवारी पुन्हा त्यांनी छातीचे सीटी स्कॅन करून घेतले. त्यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत स्वत: खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन करून उपचारासाठी मुबंई येथे जात असल्याचे सांगितले होते.

मुंबईला दोन्ही अहवाल निगेटिव्ह

छातीचा सीटी स्कॅन अहवाल निगेटिव्ह आल्यानतंर रात्रीच उपचारासाठी मुंबईला रवाना झाले होते. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल केल्यानतंर त्यांच्या दोन करोना चाचण्या करण्यात आल्या. दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळाली आहे.

वाचा: ‘या’ शक्यतेमुळं ओबीसी समाज सावध! नगरमध्ये होणार महामेळावाSource link

Leave a Reply