…म्हणून तर राष्ट्रवादीत आलो; खडसेंनी सांगितली ‘मन की बात’
‘आप्पा… खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम असते. त्यात प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व. अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,’ असं ट्विट मुंडे यांनी केलं आहे.
पवारांचा वाढदिवस! नातवानं लिहिलेल्या ‘या’ पत्राची जोरदार चर्चा
पंकजा मुंडेंनी केलं हे आवाहन
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर दरवर्षी मोठी गर्दी होत असते. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यात येत असून, मोठा कार्यक्रम होणार नाही, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
‘करोनाच्या संकटामुळे कोणालाही त्रास न होता वेगळ्या पद्धतीने १२ डिसेंबर हा दिवस साजरा करायचा आहे. मोठी सभा, गर्दी टाळायची आहे. मी स्वतः १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे. सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळून सर्वांनी गडावर दर्शन घ्यायचे आहे. महामारीच्या या संकटात सामाजिक उपयोगता आणि आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांनी १२ ते १५ डिसेंबर दरम्यान ठिकठिकाणी केवळ आणि केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.