Marathi News

guidelines for devotees: पाडव्याच्या मुहूर्तावर देवदर्शन; पहाटे सहा वाजता पहिला भाविक घेणार विठुरायाचे दर्शन – pandharpur trust issues guidelines for devotees


पंढरपूरः कोरोनाच्या संकटामुळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली मंदिरे उद्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडत असताना विठुराया व भक्ताचा आठ महिन्याचा विरह संपून सकाळी सहा वाजता पहिला विठ्ठल भक्त देवाचे मुखदर्शन घेऊ शकणार आहे.

करोनाच्या संकटामुळे मंदिर समितीने दिवसभरात दहा स्लॉट करीत प्रत्येक स्लॉट्मधे १०० भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर समितीने केल्याचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले . पंढरपुरातील सारडा भवन येथील उड्डाण पुलावरून सॅनिटाईज करून भाविक दर्शनाच्या रांगेला लागणार असून ज्याच्याकडे ऑनलाईन पास व ओळखपत्र असेल अशाच भाविकाला दर्शनाला जात येणार आहे. यासाठी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर भाविकाला आपल्या दर्शनाचे ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे.

वाचाः दर्शन सुरक्षित अंतर ठेवूनच!; धार्मिक स्थळांसाठी ‘या’ आहेत गाइडलाइन्स

येथून दर्शनाच्या रांगेत प्रत्येक तासाला १०० याप्रमाणे भाविकांना सोडण्यात येणार असून दोन भाविकांच्यामध्ये ६ फुटाच्या अंतराचे चौकोन करण्यात आलेले आहेत . शासनाने दिलेल्या सूचनेनुसार गरोदर महिला, १० वर्षाखालील बालके व ६५ वर्षांपुढील वृद्ध भाविकांना सध्या दर्शन मिळणार नाही. यासाठी ऑनलाईन पासेसची तपासणी करताना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलेले आहे.

वाचाः आठ महिन्यांनी देवदर्शन!; ‘ही’ दोन प्रमुख मंदिरे उचलणार महत्त्वाचे पाऊल

उद्या पाडव्याच्या निमित्ताने भाविकांना ठाकरे सरकारने हि खास भेट दिली असून भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येत आहे .

शासनाने करोनासाठी दिलेले नियम पाळून उद्यापासून प्रायोगिक तत्वावर प्रत्येक तासाला १०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार असले तरी काही दिवसांनी व्यवस्थेत सुधारणा करीत भाविकांची संख्या वाढू शकेल

विठ्ठल जोशी , कार्यकारी अधिकारी , मंदिर समिती

वाचाः तुळजाभवानी मंदिरात इतक्या भाविकांना घेता येणार दर्शनSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *