Marathi News

Jayant Patil: बीएमसीच्या मागच्या निवडणुकीत भाजपच्या जागा का वाढल्या? जयंत पाटील म्हणाले… – Shivsena, Congress And Ncp Will Sit Together And Decide About Mumbai Municipal Corporation Election Says Ncp State President Jayant Patil


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक एकत्र लढण्याबाबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस योग्य वेळी एकत्र बसून निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे दिली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही एकत्र असल्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढू शकतो, असेही जयंत पाटील म्हणाले. भाजपचे मुंबईतील स्थान कमी होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या वेळी शिवसेनेबरोबर आमची लढाई आहे असे दाखवून भाजपने त्यांची संख्या वाढवली. आता मुंबईकर भाजपला पाठिंबा देणार नाहीत. ती भीती असल्याने ते आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारच्या विविध विभागांना दिल्या जाणाऱ्या निधीवाटपाबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निधी वाटपात कोणाकडे दुर्लक्ष होते, असे मला वाटत नाही. निधीच कमी आहे. करोनामुळे तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे काही मर्यादा आहेत. ते सगळ्यांना माहीत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडील खात्यांना निधीची आवश्यकता आहे. पण आपले उत्पन्न मर्यादित आहे. साडे बारा हजार कोटी आपण वेतनावर खर्च करतो. राज्याच्या तिजोरीत जो महसूल गोळा होतो, तो दर महिन्याला वितरित करताना अत्यंत आवश्यकता असेल तिथे दिला जातो, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. प्रत्येक विभागांना अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली असून, ते देताना अर्थमंत्र्यांनी सगळ्यांना न्याय दिला आहे. पण आज दुर्दैवाने करोनामुळे आपल्याला मर्यादा आल्या आहेत, असेही जयंत पाटील म्हणाले.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: