‘प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या बेनामी असतील. त्यांचा कारभार व्यवस्थित नसेल. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या,’ असा दावाही सोमय्या यांनी केला. ‘शिवसेनेचे मोठे मोठे नेते आणि त्यांचे मुखिया व त्यांचा परिवार असेच उद्योगधंदे करतात हे सर्वांना माहीत आहे,’ असा थेट आरोपही सोमय्या यांनी केला आहे. शिवसेनेचे मुंबई, ठाण्यातील अनेक नेते महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हफ्ते घेतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला नको का?,’ असा प्रश्नही त्यांनी केला. सोमय्या ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
वाचा: राज्यातील दहा हजार बांधकाम प्रकल्पांचा नारळ फुटणार
प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबई व ठाण्यातील त्यांचे घर व कार्यालय अशा दहा ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत. सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक व पूर्वेश सरनाईक यांच्याही घराची झाडाझडती सुरू आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
वाचा: वर्षभरापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ होऊनही आमचं सरकार आलं; सेनेचा टोला