Marathi News

konkan railway accident: कोकण रेल्वे मार्गावर असा अपघात कधीच झाला नव्हता; सुदैवाने अनर्थ टळला! – truck falls off from ro ro train on konkan railway


सुनिल नलावडे । रत्नागिरी:

कोकण रेल्वे मार्गांवर खेड ते करंजाडीच्या दरम्यान चालत्या रोरो गाडीवरील ट्रक खाली पडल्याने विचित्र अपघात घडला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने ट्रकमधील चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच उडी मारल्यामुळे जीव वाचला. कोकण रेल्वे मार्गावर रो रो वाहतूक अनेक वर्षे चालू आहे. मात्र, रोरो ट्रेनमधून ट्रक पडण्याची ही पहिलीच घटना आहे. (Accident on Konkan Railway)

वाचा: भयानक! कारवर लघुशंका करताना हटकले म्हणून जिवंत पेटवले

मुंबईहून गोव्याकडे जाणारी रो रो रात्री एक वाजण्याच्या दरम्यान दिवाणखवटीपासून एक किलोमीटर अंतरावर आली असता रो रो ट्रेनवरील एक ट्रक अचानक खाली ट्रॅकवर पडला. काही अंतरावर ट्रकला हादरे बसत होते. त्यामुळे ट्रकमधील चालक खाली उतरला. वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून कोसळलेल्या ट्रकचा चुराडा झाला. यामध्ये ट्रेनचा मधला भाग रुळावरून खाली उतरला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. खाली पडलेल्या ट्रकमध्ये लोखंडी प्लेट होत्या. हा प्रकार झाल्यानंतर इतर गाड्या त्या त्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. कोकण कन्या आणि तुतारी या दोन गाड्या दीड ते दोन तास उशिराने धावत होत्या. पहाटेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी गेले असून या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

वाचा: म्हणजे महाराष्ट्रातही शांतता नांदेल; शिवसेनेचा भाजपला टोलाSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: