Marathi News

Maharashtra Flood Relief Package: शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणे गांजाची शेती करू द्या! – farmer sent a cheque of rs 10000 to the chief minister of maharashtra


नगर: राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केली आहे, असा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानेच दहा हजार रुपयांचा धनादेश श्रीरामपूर येथील निलेश शेडगे या शेतकऱ्याने प्रशासनाला दिला आहे. हा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्याने केली आहे. सरकारने आम्हाला खसखस व गांजा लागवडीची परवानगी दिल्यास भविष्यात शेतकरी कधीही सरकारकडे मदतीची याचना करणार नाही, असेही या शेतकऱ्याने म्हटले आहे. दरम्यान, या शेतकऱ्याने कॅनरा बँकेच्या धनादेशासह एक निवेदन मुख्यमंत्री यांना पाठवण्यासाठी श्रीरामपूर तालुका प्रशासनला दिले आहे. हे निवेदन व धनादेश नायब तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी तहसीलदारांच्या वतीने स्वीकारले आहे. ( Maharashtra Flood Relief Package Latest News )

वाचा: तुमच्या काळात सरसकट मदत कधी दिली, मुश्रीफांचा फडणवीसांवर हल्लाबोल

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यातच हेक्टरी दहा हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या घोषणेनंतर विरोधकांकडून सातत्याने राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच श्रीरामपूर येथील शेतकरी निलेश शेडगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या नावाने दहा हजारांचा धनादेश प्रशासनाला देत अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.

वाचा: शेती बुडाली म्हणून आयुष्य संपवलं; तहसीलदारांची भेट झाली असती तर…

शेडगे हे शेतकरी संघटनेशी संबंधित असून त्यांनी एक निवेदनही जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टाच केली आहे. सरकारची मदत ही तुटपुंजी असून त्यातून कोणताही आधार मिळणार नाही. या मदतीचा आपण निषेध करत आहोत. त्यामुळे सरकारला दहा हजार रुपयांचा महसूल दिला. शेतकऱ्यांना जर गांजा आणि खसखस पिकविण्याची परवानगी दिली तर सरकारी मदतीची गरज पडणार नाही. त्यातून ते सक्षम होतील, असे शेडगे यांनी स्पष्ट केले आहे.

तुमचा बाप आहेराची पाकिटं पळवणारा!; दानवेंना मिळालं ‘या’ ठाकरी भाषेत प्रत्युत्तरSource link

You may also like

%d bloggers like this: