Marathi News

maharashtra tourist places: Maharashtra Tourist Places: पर्यटनस्थळे कधी खुली होणार?; ना. धों. महानोरांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती – n d mahanor demanded to open tourist places


औरंगाबाद: राज्यातील पर्यटनस्थळे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या हजारो लहान-मोठ्या व्यावसायिकांची परवड सुरू आहे. ही माणसं उपाशीपोटी भरडली जात असल्याने काही अटी घालून पर्यटनस्थळे उघडा, अशी विनंती ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी केली आहे. पर्यटनस्थळांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. ( Maharashtra Tourist Places Latest News Updates )

वाचा: मुंबई-दिल्ली रेल्वे, विमानसेवा थांबवणार; राज्य सरकार उचलणार मोठे पाऊल

मागील आठ महिन्यांपासून पर्यटनस्थळे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांची वाताहत झाली आहे. राज्य शासनाने धार्मिकस्थळे खुली केली आहेत. शाळा उघडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे उघडण्याची मागणी वाढली आहे. वेगवेगळ्या पक्ष-संघटनांनी आंदोलनाद्वारे ही मागणी लावून धरली आहे. अजिंठा लेणी परिसरातील पळसखेडे येथे राहणारे ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनीही पर्यटनस्थळे आणि त्यावर चरितार्थ चालवणाऱ्या गरीब कुटुंबाच्या विदारक स्थितीकडे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री उद्ध‌व ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सविस्तर पत्र लिहून महानोर यांनी राज्यातील पर्यटनस्थळे उघडण्याची विनंती केली आहे.

वाचा: करोना: दिल्लीचा व्हिडिओ शेअर करून बीएमसी आयुक्तांचं मुंबईकरांना ‘हे’ आवाहन

‘लोकभावना व वास्तवाचा विचार करून आपण देवालये खुली केल्याचा आनंद आहे. मी भारताचे वैभव असलेल्या अजिंठा-वेरुळ लेणी परिसरात राहतो. महाराष्ट्रातल्या पर्यटनस्थळांशी माझे दृढ नाते आहे. आठ महिन्यांपासून ही पर्यटनस्थळे बंद आहेत. अजिंठा-वेरुळच्या पायथ्याशी सेवेत असलेली लहान जाती-जमाती, भटके, आदिवासींची पाचशे-हजार कुटुंबं आहेत. या गरीब कुटुंबांना दुसरा कुठलाही व्यवसाय ठावूक नाही व आर्थिक पाठबळ मिळत नाही. उपाशी, अर्धपोटी ही हजारो माणसं भरडली जात आहेत. हे अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव आहे. थोर प्रतिभावंतांच्या हाताची बोटं रक्ताळली-मोडली. डोळे अधू झाले. तरी मरेपर्यंत कुंचला सोडला नाही. त्यांना जगभरच्या लोकांचे आशीर्वाद आहेत. कैलास, महात्मा गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्या भेटीला आसुसलेली भारतातील सुजाण माणसं अतिशय निराश आहेत’, असे महानोर यांनी पत्रात म्हटले आहे. तातडीने पर्यटनस्थळे खुली करून या माणसांना आधार देण्याची भावना महानोर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. तसेच ही माणसं आंदोलनाकडे जातील ही वेळ येऊ देऊ नका, असेही नमूद केले आहे.

वाचा: राज्यात पुन्हा धोका वाढला?; दिवसभरात १५४ करोना रुग्ण दगावले

बंद लेणीचे नुकसान

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लेणी बंद असल्याने नैसर्गिक आघात आणि प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे. या स्थितीवर महानोर यांनी पत्रात प्रकाश टाकला आहे. संपूर्ण बंदीमुळे, अतिपावसाने, दगड-माती, मोडलेली झाडं-पाचोळा, माकडांनी व अन्य प्राण्यांनी घातलेला धुमाकूळ व घाण लेण्यांना विद्रुप करणारी व चिंतनीय बाब आहे. पर्यटनस्थळ परिसरातल्या, त्याच रोजीरोटीवर आयुष्य काढणाऱ्या हजारो दुबळ्या माणसांचा गांभीर्यपूर्वक विचार करून काही अटी घालून ही पर्यटनस्थळे खुली करावी, असे महानोर यांनी पत्रात म्हटले आहे.

वाचा: टोलमध्ये महत्त्वाचा बदल; ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ तीन मोठे निर्णयSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: