Marathi News

maratha development board: ‘म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे’ – nitesh rane slams maharashtra government over karnataka to set up maratha development board


मुंबईः कर्नाटक सरकारने मराठी भाषकांसाठी मराठा विकास प्राधिकरणाची (एमडीए) स्थापना केली आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयावरुन महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. तसंच, मराठा कार्यकर्त्यांनीही राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे. राज्यात मराठा आरक्षणाबाबत असं वातावरण असतानाच कर्नाटक सरकारने मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. यावरुन पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणावरुन वादळ उठले आहे. नितेश राणे यांनीही सरकारला घेरलं आहे. तर, महाराष्ट्रात फडणवीस सरकार पुन्हा पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

वाचाः ‘महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा सिद्ध; मुख्यमंत्री राज्य हाताळण्यात अपयशी’

‘कर्नाटकच्या भाजपा सरकारने मराठा विकास महामंडळाची स्थापना केली, ५० हजार कोटींची तरतूद पण केली आणि इथे महाराष्ट्रात मराठ्यांना फडणवीस सरकारने दिलेले सगळे बंद करुन टाकले. म्हणून पाहिजे परत एकदा फडणवीस सरकार, असं नितेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात मराठा लोकसंख्या लक्षणीय असून, या नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे. वित्त विभागाच्या मान्यतेने या प्राधिकरणासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे,’ असे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी आदेशात म्हटले आहे.

वाचाः ‘भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये’

प्रशासकीय वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात असलेला बसवकल्याण मतदारसंघ महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. या भागात मराठीभाषकांची संख्या लक्षणीय आहे. या मतदारसंघातील काँग्रेस आमदार बी. नारायण राव यांचे करोनामुळे २४ सप्टेंबरला निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती.

वाचाः महाराष्ट्राच्या दोन वीर पुत्रांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्काSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: