Marathi News

maratha development board: Maratha Board: मराठीद्वेषातून कन्नडीगांचा उन्माद; मोदींचा फोटो असलेल्या फलकाला फासले काळे – pro kannada outfit protest against maratha development board


कोल्हापूर:मराठा समाजासाठी कर्नाटक सरकारने स्थापन केलेलं प्राधिकरण आणि महामंडळाच्या वादातून पुन्हा एकदा बेळगावात मराठी व कन्नड भाषिक आमने सामने आले आहेत. मराठा विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल मराठी भाषिकांनी लावलेल्या अभिनंदनाच्या फलकाला काळे फासत कर्नाटक रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे शहरात तणाव वाढला आहे. दरम्यान, या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे फोटो असून त्याचे भान न ठेवता काळे फासले गेल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ( Maratha Development Board Latest News Updates )

वाचा: पर्यटनस्थळे कधी खुली होणार?; महानोरांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

दोन महिन्यांपूर्वी बेळगाव शेजारी असलेल्या पिरणवाडी येथे संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यावरून मराठी व कन्नड भाषिकांत जोरात वाद झाला होता. यामध्ये तडजोड करत पोलिसांनी तो वाद मिटवला होता. आता प्राधिकरणावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील मराठा समाजासाठी मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा केली होती. त्यासाठी पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली. १३ नोव्हेंबर रोजी केलेल्या या घोषणेनंतर त्याला कन्नड भाषिकांनी जोरदार विरोध केला. पाच डिसेंबर रोजी राज्य बंदची हाक दिली. यामुळे सरकारने तातडीने एक पाऊल मागे घेत प्राधिकरणाऐवजी मराठा समाज महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली.

वाचा: दिवाळीनंतर चित्र बदलू लागले; आज १५५ करोनामृत्यू, ‘हा’ आकडा चिंतेचा

महामंडळ स्थापन झाल्यानंतर राज्यातील मराठा भाषिकांनी आनंदोत्सव साजरा केला. काही ठिकाणी सरकारच्या अभिनंदनाचे फलक झळकले. बेळगावचे आमदार अभय पाटील यांच्या समर्थकांनी अनगोळ नाक्यावर काही फलक लावले. मात्र सायंकाळी या फलकाला कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. पिरणवाडी येथे पुतळ्यावरून झालेला वाद ताजा असताना पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. बेळगावात मराठा भाषिकांवर अत्याचार करत कर्नाटक सरकार एकीकडे त्रास देत असताना कन्नड भाषिकही जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करत असल्याने मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

वाचा: बारामतीत सावकारीचा बळी; राष्ट्रवादीवरील ‘हा’ आरोप भाजपवरच बुमरँग?Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: