Marathi News

Martyr Rishikesh Jondhale: महाराष्ट्राच्या दोन वीर पुत्रांना आज अखेरचा निरोप – wreath laying ceremony of naik satai bhushan rameshrao and rishikesh jondhale who lost his life during ceasefire violation by pakistan


कोल्हापूरः कुरापतखोर पाकिस्तानने ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना नियंत्रण रेषा भागात केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचे दोन वीरपुत्र शहीद झाले आहेत. आज या दोन्ही जवानांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी दाखल झाले असून तिथे शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढतान वीरमरण आले आहे. वीर जवान ऋषिकेश जोंधळे याचा पार्थिव रविवारी त्याच्या बहिरेवाडी गावात त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. तर, नागपुरात भूषण सतई याच्या पार्थिव दाखल झाले आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. भूषण यांचे पार्थिव काही वेळातच त्यांच्या मुळ गावी नेण्यात येणार आहे.

जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी जमली आहे. दिवाळीतच झालेल्या या दुर्घटनेमुळं गावात कोणीही दिवाळी साजरी केली नाहीये. ऋषिकेश हा ६ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होता. ११ जून रोजी त्याने ड्युटी जॉइन केली होती. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्याची भारतीय लष्करात भरती झाली होती. त्याला एक लहान बहीण असून ऋषिकेशच्या निधनाने दु:खाचा डोंगरच जोंधळे कुटुंबीयावर कोसळला आहे.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: