Marathi News

minister chhagan bhujbal: मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्याला करोना – officer who participated in the visit of minister chhagan bhujbal is tested corona positive


म. टा. वृत्तसेवा, येवला: येवला प्रांताधिकारी सोपान कासार यांना करोनाची बाधा झाली असून त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान प्रांताधिकारी हे शनिवारच्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला दौऱ्यात दिवसभर सहभागी झाले होते. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

प्रांताधिकारी सोपान कासार यांना ताप व सर्दी अशी करोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करोनाची टेस्ट करून घेतली होती. शनिवारी प्रांताधिकारी कासार हे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला दौर्‍यात सहभागी झाले होते. तोपर्यंत त्यांचा अहवाल आला नव्हता. शनिवारी रात्री उशिरा अहवाल प्राप्त होताना प्रांताधिकारी कासार हे करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.

पुन्हा सज्जता! मुंबईबाहेरुन येणाऱ्यांच्या चाचण्या, करोना केंद्रे सतर्क

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यात नवीन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तसेच प्रशासनाकडून आवश्यक असलेली संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. गर्दी टाळतानाच, मास्क वापरण्याबाबतही वारंवार आवाहन करण्यात येत आहे. शनिवारी ५ हजार ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ४,०८८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,४७,००४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८२ % एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यात ७९ हजार ८७३ अॅक्टिव्ह केस असून राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली; ‘ही’ धोक्याची घंटा तर नाही?Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: