अत्यंत साधी राहणी आणि सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत त्यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्या त्याचा वाटा मोठा होता. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मोहन रावले गेले, असे सांगत कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले नेते असे वर्णन करत संजय राऊत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोहन रावले यांची ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच ओळख होती. मोहन रावले पाच वेळा खासदार झाले, मात्र अखेरपर्यंत ते सगळ्यांसाठी मोहनच राहिले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभाग
पुरर्रचित मतदारसंघ झाल्यानंतर मात्र सन २००९ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गिरणगावाशी नाळ जुळलेले मोहन रावले नेहमीच कामगार आंदोलनात दिसत असत. ते गिरणीकामगाराचे पुत्र होते. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी संसदेचे काम थांबवले होते.अनेकदा त्यांनी गिरणीकामगारांच्या न्याय्यहक्कांसाठी आंदोलने केली आहेत.
मोहन रावले यांनी सन १९७९-८४ या काळात भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळले होते. पुढे १९९१ पासून ते २००९ पर्यंत सलग पाच वेळा दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत.
क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसची आज महत्वाची बैठक; हा नेत्याने सोनियांना म्हटले, ‘पुत्र की लोकशाही?’
मोहन रावले यांच्यावर झाली होची पक्षकारवाई
कडवट शिवसैनिक आणि प्रसंगी आंदोलनांमध्ये रक्त सांडलेले मोहन रावले हे नंतरच्या काळात शिवसेनेपासून दूर जाऊ लागले. सन २०१३ मध्ये त्यांनी पक्ष नेतृत्वावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करत पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. असे असले तरी काही काळानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.
क्लिक करा आणि वाचा- सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
क्लिक करा आणि वाचा- करोनाची लस ऐच्छिक; केंद्राकडून लसीकरणाबाबक सूचना जाहीर