Marathi News

mp navneet rana: राणा दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात; हे सर्व कधी थांबणार?; फडणवीसांचा सवाल – mp navneet rana detain by police; devendra fadanvis attacks on government


मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत सरकारवर टीका केली आहे. लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

विदर्भातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार हेक्टरी मदत व लॉकडाऊन काळातील विजेचे बिल अर्धे माफ करावे. या मागण्यांसाठी राणा दाम्पत्य आज मुंबईला निघणार होते. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या वर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईत करोना संसर्गाला ब्रेक; रुग्णदुपटीचा काळ वाढला

‘शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली म्हणून आंदोलन केलं तर कारागृहात डांबले. शेतकऱ्यांचे निवेदन घेऊन मातोश्रीवर भेटण्यासाठी रेल्वेनं निघाले, तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा अमरावतीत पुन्हा स्थानबद्ध. २५- ५० हजार हेक्टरी मदतीच्या गप्पा करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा इतका तिरस्कार का?, असा खरमरीत सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

तुळजाभवानी मंदिरात इतक्या भाविकांना घेता येणार दर्शन

निवेदन स्वीकारुन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली असती, त्यांचे दुःख समजून घेतले असते. तर, किमान आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे तर समाधान शेतकऱ्यांना मिळाले असते. आंदोलन केले की अटक, कोणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा? लोकशाहीत चर्चेला स्थानच नाही का?, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

करोनाग्रस्त महाराष्ट्राला मोठा दिलासा; ‘हे’ आकडे शुभसंकेत देणारेSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: