Marathi News

mumbai news News : करोनामुळे मुंबईत सार्वजनिक छटपूजेस बंदी – no chhath puja allowed at mumbai beaches, ponds due to covid 19


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत करोनाची दुसरी लाट येण्याची भीती लक्षात घेत शुक्रवार २० नोव्हेंबर आणि शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या छटपूजेस मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. छटपूजेसाठी तलाव, नदी, समुद्र किनारी गर्दी होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे.

पालिकेने मंगळवारी काढलेल्या परिपत्रकात मुंबईत सामूहिक छटपूजा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नदी, तलाव, समुद्रकिनारी छटपूजेचे आयोजन केले जाते. मात्र करोनाने सामाजिक वावराचे नियम पाळणे कठीण होऊ शकते, हे ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. छटपूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक समुद्रकिनारी, तलाव, नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. मात्र, आता करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंध घालण्यात येत आहेत. त्याचवेळी, या पूजेसाठी कृत्रिम तलाव पर्याय देण्यात आला आहे. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: