Marathi News

Mumbai Police: सॅल्यूट मुंबई पोलीस! खेळता-खेळता २ वर्षांचा चिमुकला हरवला, अवघ्या ३५ मिनिटांत शोधले – mumbai police finding 2 year old boy from dongri area just 35 minutes


‌म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दोन वर्षांचा लहानगा डोंगरी येथील घरात खेळत होता. खेळता खेळता तो अचानक दिसेनासा झाला आणि आई-वडिलांच्या काळजात धस्स झाले. आजूबाजूला कुठेच दिसत नसल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाणे गाठले. गुन्हेगारी वस्ती, गजबजलेला भाग अशा परिस्थितीत दोन तास हा मुलगा सापडला नसल्याचे पाहून डोंगरी पोलिसांनी तातडीने शोध घेत अवघ्या ३५ मिनिटांत या लहानग्याला शोधून काढले.

डोंगरी हा प्रचंड गजबजलेला परिसर आहे. याच ठिकाणी असलेल्या टोपीवाला बिल्डिंगमध्ये उमर शेख यांचे कुटुंब राहते. २० ऑक्टोबरला उमर शेख यांचा दोन वर्षांचा मुलगा इमाद घराबाहेर खेळत होता. बराच वेळ इमाद दिसला नाही, म्हणून त्याच्या आईने घराबाहेर पाहिले असता, तो कुठेच दिसला नाही. आजूबाजूच्या घरात शोधले. अनेकदा हाका मारल्या. मात्र, इमाद प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने याबाबत इमादच्या वडिलांना कळविले. दोघेही शेजारच्यांच्या मदतीने इमादला शोधू लागले. जवळपास दोन तास झाले, तरी इमाद कुठेच दिसत नसल्याचे पाहून आई-वडिलांनी डोंगरी पोलिस ठाणे गाठले.

उमर शेख आणि त्यांची पत्नी इमादबाबत पोलिसांना सांगत होती. इमाद अचानक दिसेनासा झाल्याने घाबरलेल्या आईच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हते. इमादची तक्रार घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप बागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दीपक जाधव, तांबोळी, उपनिरीक्षक खुळे, धुमाळ यांनी इमादचा शोध सुरू केला. काही दिवसांपूर्वी डोंगरी परिसरात सात वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे इमादच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व बीट मार्शलना तत्कळ कळविण्यात आले. एक पथक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत होते, तर इतर पोलिस गल्लोगल्ली फिरून वर्णनानुसार इमादचा शोध घेत होते. परिसर पिंजून काढत असताना, काही अंतरावर असलेल्या अन्सारी टॉवरजवळ इमाद एकटाच फिरताना दिसला. खुळे यांच्या पथकाने इमादला पोलिस ठाण्यात आणले. इमादला पाहून आईने त्याला कुशीत घेतले. लहानग्याला आईच्या कुशीत पाहून पोलिसांनाही आनंद झाला.

रात्री दुकान बंद करून मालक घरी निघाला, इतक्यात तिघे दुचाकीवर आले अन्

CCTV: नागपुरात मध्यरात्री कार पेटवली, ८ वाहनांची केली तोडफोड

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

लग्नात अडथळा आणत होता, संतप्त तरुणाने शेजाऱ्याची दुकाने जेसीबीने केली भुईसपाटSource link

You may also like

%d bloggers like this: