Mumbai Police Has Issued A Notice To Kangana Ranaut – देशद्रोहाचा गुन्हा; मुंबई पोलिसांकडून कंगनाला तिसऱ्यांदा समन्स


मुंबई: अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंदेल हिला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स जारी केले आहे. वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात कंगनाला २३ तर रंगोली हिला २४ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी कंगनाला २६ ऑक्टोबर आणि २७ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, दोघींनीही चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर, १० नोव्हेंबर रोजी कंगनाला आणि रंगोली हिला ११ नोव्हेंबर रोजी हजर राहावे, अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंगनानं भावाच्या लग्नाचं कारण पुढे करत चौकशीसाठी हजर राहण्यास नकार दिला होता.

याला म्हणतात स्वत:च्या हातानं तोंडाला काळं फासणं

मुंबई पोलिसांकडून कंगनाला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत. कंगनाकडून अद्याप या समन्सला उत्तर देण्यात आले नाहीये. त्यामुळं कंगना यावेळी तरी चौकशीसाठी हजर राहणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘कौतुक आणि टीका दोघांचेही स्वागत, लवकरच नवीन गाणं घेऊन येणार’

नेमकं काय आहे प्रकरण?

सोशल मीडियावर कंगना राणावत हिनं केलेल्या एका आक्षेपार्ह ट्वीटविरोधात दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर यालयाच्या आदेशानुसार कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.Source link

Leave a Reply