Marathi News

Nagpur Suicide Case: 18 Year Old Ended His Life After A Birthday Party – Nagpur Suicide: बर्थ डे पार्टी दणक्यात झाली; रात्री शेतावर झोपायला गेला आणि…


नागपूर: कुटुंबीय व मित्रांसोबत स्वत:च्या वाढदिवसाची पार्टी साजरी केल्यानंतर त्याच रात्री एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. रंजीत अरविंद गजघाटे (वय १८, रा. कान्हवा) असे या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. ( Nagpur Crime News Latest Updates )

वाचा: शरद पवारांनंतर आता पृथ्वीराज यांना आयकर नोटीस; मागितली ‘ही’ माहिती

ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा खुर्सापार येथे घडली. रंजीत बोलेरो पीकअप चालवित असे. तसेच शेतीची कामेही बघत असे. मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता. संध्याकाळी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसासाठी त्याची मित्रमंडळी घरी आली होती. कुटुंबीय आणि मित्रांसोबत त्याने घरीच केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर रात्री शेतावर झोपण्यासाठी म्हणून तो गेला. मात्र दुसऱ्या दिवशी त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आणि सगळेच हादरले.

वाचा: … तर कंगनाला त्वरित अटक होऊ शकते, उज्ज्वल निकम यांनी मांडले ‘हे’ महत्त्वाचे निरीक्षण

रंजीतने गजानन बोरकर यांच्या मौजा खुर्सापार फाटा येथील शेतामधील पळसाच्या झाडाला गळफास लावून घेतला. याबाबत माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील सोपस्कार पूर्ण केले असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रंजीतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाचा: राज्यात पुन्हा धोका वाढला?; दिवसभरात १५४ करोना रुग्ण दगावलेSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: