Marathi News

Narayan Rane and Uddhav Thackeray – जे परीक्षेलाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?: नारायण राणे


मुंबई:हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हणणाऱ्या शिवसेनेवर भाजप नेते, खासदार नारायण राणे यांनी आज जोरदार टीका केली. ‘जे परीक्षेला बसत नाहीत आणि पासही होत नाहीत. त्यांना सर्टिफिकेट कोण देणार?,’ असा टोला राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हाणला.

पालघरमधील साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडं सोपवण्याच्या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘जन आक्रोश यात्रा’ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या यात्रेला परवानगी नाकारत राम कदम यांना ताब्यात घेतले व सोडून दिले. कदम यांच्या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी नारायण राणे यावेळी उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ‘शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही. हिंदुत्व ही उद्धव ठाकरेंची विचारसरणी नाही. ते तडजोड करणारे आणि पदासाठी हवं ते करणारे आहेत. शिवसेना व हिंदुत्व हे समीकरण जुळणारं नाही,’ असं राणे म्हणाले.

वाचा: कोकण रेल्वेवर प्रथमच विचित्र अपघात; सुदैवाने अनर्थ टळला!

‘भाजपशी गद्दारी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून बसले, काँग्रेस-राष्ट्रवादीशी समझोता केला, तिथंच त्यांनी हिंदुत्व सोडलं. सर्वधर्म समभाववाल्यांसोबत गेलेल्यांकडून साधूसंतांच्या रक्षणाची अपेक्षा ह्यांच्याकडून काय करणार?,’ असा सवाल राणेंनी केला.

वाचा: भयानक! कारवर लघुशंका करताना हटकले म्हणून जिवंत पेटवले

उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही त्यांनी टीका केली. ‘मागच्या एक वर्षात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी काय काम केलं? कृषी, शिक्षण, कायदा-सुव्यवस्था कुठल्या क्षेत्रात काम केलं? फक्त पिंजऱ्यात बसतात आणि राम राम म्हणतात. म्हणूनच आमच्या राम कदमांना आंदोलन करावं लागतंय,’ असा चिमटाही राणेंनी काढला.

वाचा: म्हणजे महाराष्ट्रातही शांतता नांदेल; शिवसेनेचा भाजपला टोलाSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: