Marathi News

Nitin Raut: भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास: नितीन राऊत यांचा पलटवार – relaxation in electricity bills not possible; nitin raut taunt bjp


मुंबई: लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर नितीन राऊत यांनी या सगळ्याप्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

‘करोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झााला आहे. मात्र, महावितरणला सर्वात मोठा फटाका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सरासरी कार्यक्षमता न दाखवल्यानं व वीज बिलांची वसुली न केल्यानं बसला आहे. भाजप सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींच्या जवळपास पोहोचली आहे,’ अशा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

‘वीज बिलात सूट द्या, अन्यथा तुमची सुट्टी करायला वेळ लागणार नाही’

‘करोना काळात वीज बिलं भरली न गेल्याने महावितरणची थकबाकी ९ हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये ५९,१०२ कोटींवर पोहचली. मार्च २० ला घरगुती ग्राहकांकडे असलेली १हजार३७४ कोटींची थकबाकी ही ४ हजार८२४ कोटींवर पोहचली. वाणिज्य ग्राहकांची ८७९ वरून १ हजार २४१ कोटींवर तर औद्योगिकची ४७२ वरून ९८२ कोटींवर पोहचली.” असं देखील नितीन राऊत म्हणाले आहेत.

वरवरा राव यांच्यावर नानावटी रुग्णालयांत होणार उपचार

दरम्यान, महावितरणचे जसे वीज ग्राहक आहेत, त्याचप्रमाणे महावितरणही एक ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावी लागते. विविध प्रकारचे शुल्क द्यावे लागते. महावितरणची सध्याची थकबाकी ३१ टक्के आहे. ग्राहकांकडून देयके भरली जात नाहीत. त्यामुळं सवलत दिली जाणं अशक्य आहे. मात्र, कोणाचीही वीज जोडणी कापली जाणार नाही,’ असं राऊत यांनी स्पष्ट केलं. ‘ऊर्जा विभागातील कंपन्यांवर ६९ हजार कोटी रुपयांचा कर्जभार आहे. आता आणखी कर्ज काढणं शक्य नाही. ग्राहकांना वीज बिलात दिलासा देता यावा यासाठी राज्य सरकारनं खूप प्रयत्न केला. त्यासाठी केंद्र सरकारकडं मदत मागितली. मात्र, दुर्दैवाने केंद्र सरकारकडून काहीही मदत मिळाली नाही, असं नितीन राऊत यांनी म्हटलं होतं.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: