Marathi News

online study tension: ऑनलाइन अभ्यासाचा ताण; भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने घेतले विष – brother and sister take poison due to online study tension


म.टा.प्रतिनिधी,जळगावः मुंबईत शिक्षण घेत असलेल्या भाऊ-बहिणींनी अभ्यासाच्या तणावातून आलेल्या नैराश्यामुळे ऐन भाऊबीजेच्या दिवशी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात बहिणीचा मृत्यू झाला तर भाऊ अत्यवस्थ आहे.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता भोलाणे (ता. जळगाव) येथे ही घटना घडली. अश्विता विजय कोळी (सपकाळे, वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर तीचा मोठा भाऊ विश्वजीत (वय २२) हा अत्यवस्थ आहे. त्यांचे वडील हे निवृत्त बसवाहक आहेत. तर सध्या भोलाणे येथे शेती करीत आहेत.

अश्विता व विश्वजीत हे दोघे उल्हासनगर येथे महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेथेच वडीलांनी घेऊन दिलेल्या घरात दोघे राहत होते. अश्विता प्रथम वर्ष विज्ञान शाखा तर विश्वजीत शेवटच्या वर्षाला होता. लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे महाविद्यालय बंद झाले. यानंतर दोघे जण मुळ गावी भोलाणे येथे आले. दरम्यान, आता महाविद्यालयाचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाला आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे त्यांना अभ्यासात मन लागत नव्हते. अनेक विषयांचे ज्ञान व्यवस्थित मिळत नव्हते. त्यामुळे दोघेजण नैराश्यात आले होते.

वाचा:पिता-पुत्र अपघातात ठार; महामार्गाच्या दूरवस्थेमुळे झाला घात

दरम्यान, १६ रोजी भाऊबीजेच्या दिवशी रात्री १० वाजता दोघांनी राहत्या घरात विषारी औषध घेतल्याने ते अत्यवस्थ झाले. हा प्रकार लक्षात येताच वडीलांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच अश्विताचा मृत्यू झाला. यानंतर विश्वजीत याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.

वाचा: पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने रेल्वे ट्रॅकजवळ फेसबुक लाइव्ह केले आणि…

अश्विताच्या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साहेबराव पाटील तपास करीत आहेत. पोलिसांनी विश्वजीत याचा जबाब नोंदवला आहे. अभ्यासाच्या तणावातून नैराश्य आले, त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. असा जबाब त्याने पोलिसांना दिला आहे.

गिफ्टमुळे नाराजी झाल्याची चर्चा

दरम्यान, अश्विता व विश्वजीत यांना दिवाळी, भाऊबीजेच्या निमित्ताने वडीलांकडे चांगले गिफ्ट हवे होते. हे गिफ्ट न मिळाल्यामुळे दोघे प्रचंड नाराज झाले होते. त्यातूनही त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा अशी चर्चा होती.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: