Marathi News

orange ration card holders: पुण्यातील केशरी रेशनकार्डधारकांना ‘तो’ लाभ नोव्हेंबरपासून – subsidised wheat rice for orange ration card holders in pune from november


पुणे: राज्य सरकारने केशरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप करण्याचा निर्णय घेतला असला तरी जुलै महिन्याचे धान्य हे शहर अन्नधान्य वितरण विभागाकडे आता उपलब्ध झाले आहे. त्यामुळे येत्या एक नोव्हेंबरपासून या कार्डधारकांना धान्यवाटप केले जाणार आहे. ( Orange Ration Card Latest News )

वाचा: करोना चाचणी झाली आणखी स्वस्त!; राज्यात ‘हे’ आहेत नवे दर

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशन कार्डधारकांना एक मे पासून स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप करण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइनमधून वगळल्या गेलेल्या किंवा ऑनलाइन नोंदणी नसलेल्या केशरी रेशनकार्डधारकांना धान्य वितरित होत आहे. या नागरिकांना आठ रुपये प्रति किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलोने तांदूळ याप्रमाणे प्रति व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत आहे. या लाभार्थ्यांसाठी जुलै महिन्याचे धान्य उपलब्ध झाले आहे.

वाचा: शरद पवार, धनंजय व पंकजा मुंडे यांची बैठक; झाला ‘हा’ खूप मोठा निर्णय!

याबाबत शहर अन्नधान वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या, ‘जुलै महिन्याचे धान्य आले आहे. हे धान्य एक नोव्हेंबरपासून वाटपास सुरुवात केली जाणार आहे.’ दरम्यान, प्राधान्य कुटुंब लाभार्थी गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना ३५ किलो धान्य हे दोन रुपये प्रति किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ स्वस्त धान्य दुकानांतून देण्यात येत आहे.

वाचा: पोलीस ठाण्यात व्हॉइस रेकॉर्डिंग; ‘त्या’ दोघांवर थेट हेरगिरीचा गुन्हाSource link

You may also like

%d bloggers like this: