Marathi News

P Chidambaram: निवडणुकीतील पराभवावरून काँग्रेसमध्ये रंगला कलह; आता चिदम्बरम म्हणाले… – congress defeat in elections p chidambaram also raised questions after kapil sibal


नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतील ( bihar election ) पराभव आणि नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीनंतर ( by election 2020 ) पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ज्येष्ठ नेतेत कपिल सिब्बल ( kapil sibal ) यांनी सोमवारी कॉंग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्या नेत्यांना कॉंग्रेस हा योग्य पक्ष नाही असं वाटतं, त्यांनी नवीन पक्ष स्थापन करावा किंवा दुसर्‍या पक्षात सहभागी व्हावं, असं लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हणाले. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम ( p chidambaram ) यांच्या वक्तव्यामुळे या वादात आणखी भर पडलीय. निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्याची गरज चिदम्बरम यांनी व्यक्त केली.

बिहारमधील कॉंग्रेसची सुमार कामगिरी आणि नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीनंतर आता कॉंग्रेस पक्षातील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी नाराजी व्यक्त केलीय. “कॉंग्रेस आपल्यासाठी आता योग्य पक्ष नाही, असं ज्यांना वाटतंय ते नेते नवीन पक्ष स्थापन करू शकतात. त्यांची इच्छा असल्यास ते दुसर्‍या पक्षातही जाऊ शकतात. कॉंग्रेसमध्ये राहून अशी लज्जास्पद वक्तव्ये केल्याने पक्षाच्या विश्वासार्हतेला ठेच पोहोचते, असं चौधरी म्हणाले.

कपिल सिब्बल हे पक्षाच्या स्थितीवर नाराज आहेत. पण निवडणूक प्रचारासाठी ते बिहार किंवा उत्तर प्रदेशात गेले होते का? प्रत्यक्षात पक्षासाठी कुठलंही काम न करता अशा प्रकारी वक्तव्य करणं निरर्थक आहे, असा टोला अधीर रंजन चौधरींनी लगावला.

माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी सोमवारी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. जनता कॉंग्रेसकडे एक मजबूत पर्याय म्हणून पाहत नाहीए, असं सिब्बल म्हणाले. आता माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत दिलीय. “गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील पोटनिवडणुकीच्या निकालांबाबत आपल्याला अधिक चिंता वाटते. पक्ष स्थानिक पातळीवर अतिशय कमकुवत झाल्याचं या निकालवरून स्पष्ट होतंय. बिहारमध्ये आरजेडी-कॉंग्रेससाठी सकारात्मक वातावरण होतं. विजयाच्या इतक्या जवळ जाऊनही आपला पराभव का झाला. याची समीक्षा केली पाहिजे, असं चिदम्बरम म्हणाले.

‘राज्यघटनेचं कौतुक फक्त दिखावा, RSS चे विचार बरोबर विरुद्ध’

१२ वी पास नेता अर्थमंत्री, तर भरती घोटाळ्यातील आरोपी शिक्षणमंत्री

आशा प्रकारच्या वक्तव्यांवर माजी परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्रत्येक पक्षात असं घडतं. विजयाबद्दल कुणी काहीही बोलत नाही. पण पराभवावर मात्र उठसूट प्रत्येक जण बोलतो. प्रत्येक पक्षात असं होतं. कॉंग्रेसही त्याला अपवाद नाही, असं सलमान खुर्शी म्हणाले होते.Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: