Marathi News

prajakta tanpure: बनावट डिझेल प्रकरणाचा सूत्रधार कोण?; ‘या’ मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण – fake petrol and diesel case in ahmednagar; ncp leader give reaction


म.टा.प्रतिनिधी, नगर: नगर जिल्ह्यामध्ये गाजत असलेल्या बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ प्रकरणावर मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ‘ज्या गोष्टीसोबत माझा संबंध नाही, त्याकडे मी लक्ष देत नसतो. आता माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मुद्दे राहिले नाहीत, उगाच काहीतरी ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. मला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सुद्धा वेळ नाही,’ असा घणाघात तनपुरे यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळत केला.

राजकीय मंत्र्याचा दबाव असल्यामुळे बनावट डिझेल प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाती लागत नसल्याचा आरोप माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला होता. तसेच या प्रकरणाचे राहुरी कनेक्शन ही असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर आज तनपुरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘ज्या गोष्टी सोबत माझा संबंध नाही, अशा बिनबुडाच्या आरोपांवर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. काही मुद्दे राहिले नाही की उगाच काहीतरी आरोप काही जण करतात. अशा गोष्टींकडे लक्ष मी देत नाही. कारण माझ्याकडे भरपूर सकारात्मक, विधायक कामे आहेत, व अशा कामांमध्ये मी व्यस्त आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा?; चंद्रकांत पाटील म्हणतात…

‘बनावट डिझेल प्रकरणातील आरोपी जरी राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी असले, तरी शेवटी त्यांच्या व्यवसायपर्यंत आम्ही खोलात जात नाही. कारण पक्षासाठी योगदान एखादी व्यक्ती देत असेल तर तिथपर्यंत ठीक आहे, पण याचा असा अर्थ होत नाही की त्या व्यक्तीचा स्वतःच्या व्यवसायात आम्ही लक्ष घातले पाहिजे. अर्थात त्याने जर चुकीचे केले असेल, तर ते चुकीचे आहे. कोणी किती जवळचा असेल आणि तो चुकीचे काम करत असेल तर राष्ट्रवादी पक्ष कोणालाही पाठीशी घालणार नाही. आमचा पक्ष हा अत्यंत प्रामाणिक विचाराने काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही,’ अजा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.

मोफत विजेचं काय झालं?; ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासाSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: