Marathi News

Prasad Lad criticises Eknath Khadse: ‘…म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना डोक्यावर घेतेय’ – bjp mla prasad lad targets ncp & eknath khadse


मुंबई: ‘देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत हल्ले करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंना डोक्यावर घेत आहे. पण, खडसेंमुळं उत्तर महाराष्ट्रात भाजपचं काहीही नुकसान होणार नाही. खडसे इतक्या ताकदीचे नेते होते तर स्वत:च्या मुलीला निवडून का आणू शकले नाहीत,’ असा बोचरा सवाल भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केला आहे.

वाचा: भाजपला हे कळलं नाही, तसं तेही कळणार नाही; जयंत पाटलांची टोलेबाजी

एकनाथ खडसे यांनी अलीकडंच भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खडसेंच्या पक्षांतरामुळं उत्तर महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलतील, अशी चर्चा आहे. अशातच येत्या २० व २१ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पवारांचा त्या भागातील हा पहिलाच दौरा आहे. त्या निमित्तानं खडसे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचीही चर्चा आहे. याबाबत प्रसाद लाड यांना विचारलं असता खडसेंमुळं भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला.

वाचा: मंदिरं बंद करण्याचा आदेश मोदींनीच दिला होता; राष्ट्रवादीचा पलटवार

‘उत्तर महाराष्ट्रात भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. भाजप सक्षम आहे. आमच्या पद्धतीनं आम्ही करत आहोत. खडसेंचा उलटा प्रवास सुरू झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. त्यांना जे करायचं ते करू द्या,’ असं लाड म्हणाले. ‘शरद पवार हे मागील ५० वर्षांपासून राज्याचे दौरे करत आहेत. त्यांचे दौरे नवीन नाहीत. तो त्यांच्या आवडीचा विषय आहे. मात्र, खडसेंच्या जिल्ह्यात दौरा केल्यामुळं भाजप कमकुवत होईल, असं मानण्याचं कारण नाही,’ असंही लाड म्हणाले.

वाचा: पालघर साधू हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही; भाजपचा इशाराSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: